काही दिवसांपूर्वी रोहित पवार अरणगाव येथे रमेश महाराज वसेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळेस महाराजांचे जुने वाहन पाहून त्यांनी नवीन कार देण्याचे ठरविले होते. आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार पवार यांच्यामार्फत करण्यात आला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण सारखी महत्वपूर्ण कामे हाती घेत या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला.
रोहित पवार यांनी महाराजांच्या सेवेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून वाहन भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत रविवारी पवार यांनी नवे वाहन रमेश महाराज वसेकर यांना सुपूर्द केले. यावेळी पवार म्हणाले, ‘संत सावता महाराजांचे अनुयायी संबंध राज्यभरात आहेत. त्यांच्या कार्याची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी व समाज उद्धराचे कार्य पार पडावे, यासाठी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना वाहन भेट म्हणून देण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यात खेडोपाडी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून संत सावता महाराजांच्या विचारांची पेरणी करता येईल.’
रमेश महाराज वसेकर म्हणाले की, ‘आमदार पवार यांनी संत सावता महाराजांच्या मंदिराचा अतिशय सुंदर प्रकारे जीर्णोद्धार करून मंदिराला एक लौकिक प्राप्त करून दिला आहे. संतांची सेवा हीच मोठी सेवा आहे. आमदार पवार यांच्यासारखे एक युवा नेतृत्व संत परंपरेच्या उत्कर्षासाठी कायम झटत आहे, हे पाहून अभिमान वाटतो. याच दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेली राज्यस्तरीय भजन स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम असून यातून संत परंपरेतील एकता, समता यांचा संदेश युवा पिढीपर्यंत पोहचवण्याचे यातून काम होत आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times