कोलंबो: भारताचा एक संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास पोहोचलेले भारतीय संघातील २० खेळाडूंनी एकत्र सराव करण्यास सुरुवात केली आहे. या संघाचे प्रशिक्षक माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख हे आहेत.

श्रीलंकेत पोहोचण्याआधी भारतीय संघ मुंबईत १४ दिवस क्वारंटाइन होता. त्यानंतर लंकेत पोहोचल्यानंतर देखील ते तीन दिवस क्वारंटाइनमध्ये होते. आता भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने () याचा व्हिडिओ शेअर केलाय.

भारतीय संघातील खेळाडू १७ दिवस क्वारंटाइमध्ये होते आता बाहेर येऊन एकमेकांना भेटत आहेत. १७-१८ दिवसांपासून आम्ही क्वारंटाइनमध्ये होतो. खेळाडूंना आता खुप छान वाटत आहे. थोडे हसण्या खेळण्याची संधी मिळत आहे, असे द्रविडने सांगितले.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. अशा वेळी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी दुसरा संघ पाठवला आहे. या दौऱ्यात शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडवर देण्यात आली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मोठी मालिका खेळत आहे. कोच म्हणून राहुल द्रविडची निवड झाल्यामुळे भारतीय खेळाडूच नाही तर चाहते देखील खुश झाले आहेत.

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघासाठी ही शेवटीच मालिका आहे.

एका बाजूला चाहते या मालिकेची वाट पाहत असताना श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारताने दुय्यम दर्जाचा संघ पाठवून अपमान केल्याची टीका केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here