वॉर्सेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने रोमांचक विजय मिळविला. मिताली राजने कर्णधाराला साजेशी खेळी करत विजय साजरा केला. त्यानंतर बीसीसीआयने ड्रेसिंग रूममधील या रोमांचक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरवातीला आणि जेमिमा रॉड्रिग्ज सोबत बसलेल्या दिसतात. भारताला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती. त्यावेळी स्मृती आणि जेमिमा यांच्यात सुरू असलेलं संभाषण यात दाखवण्यात आलं आहे. चार चेंडूत 4 धावांची गरज असताना मितालीने चौकार खेचत विजय साजरा केला. मितालीने मारलेल्या विजयी चौकारावर ड्रेसिंग रुममध्ये विजयाला उधाण आले.

वाचा-

सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू प्रतिक्रिया देताना दिसून येतात. जेमिमा रॉड्रिग्जने हरमनप्रीत कौर आणि प्रिया पुनिया यांना सांगितले की, मला स्कोअर बोर्ड दिसत नव्हता. त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपले मत व्यक्त केले. आम्हाला या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील कामगिरीत चांली सुधारणा झाली आहे. पण विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी सुधारणे आवश्यक आहे.

वाचा-

पोवार कर्णधार मिताली राजच्या कामगिरीबद्दल म्हणाले की, ती कौतुकास पात्र आहे. कारण गेली 22 वर्षे ती टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि ती सर्व खेळाडूंसाठी एक आदर्श निर्माण करत आहे. इंग्लंडने दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीची डोकेदुखी पुन्हा समोर आली. मितालीने शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. तिने 75 धावांची नाबाद खेळी केली.

वाचा-

वाचा-

एकदिवसीय मालिका भारताला 1-2 ने गमवावी लागली असली तरी टी-20 मालिका जिंकण्याचे लक्ष्य भारतीय संघापुढे आहे. टी-20 संघाच्या नेतृत्वाची धुरा हरमनप्रीत कौरकडे असणार आहे. 9 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरवात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजल्यापासून सामन्याला सुरवात होईल. पहिला सामना 9 जुलै रोजी नॉर्थम्पटन येथे, तर दुसरा सामना 11 जुलै रोजी काउंटी ग्राउंडवर आणि शेवटचा तिसरा सामना 15 जुलैला चेम्सफोर्डवर खेळला जाणार आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here