शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाले. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या, अशी सूचना सत्तासंघर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना मी केली होती. माझे ते म्हणणे फडणवीसांनी ऐकले असते तर ते आज मुख्यमंत्री असते, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं होतं.
रामदास आठवले यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे. रामदास आठवलेंनी योग्य वेळी योग्य व्यक्तींचे सल्ले ऐकले असते, तर ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते, असं मिश्किल उत्तर फडणवीसांनी दिलं आहे. राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय आजपासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
वाचाः
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीवरही देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. शिवसेनेसोबतच्या संबंधांवरही ते बोलले. शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही, तर केवळ वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात लढले त्यांचा हात पकडला म्हणूनच मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times