कंपनीकडून बुधवार, ७ जुलै २०२१ रोजी इक्विटी शेअर्स विक्रीची विक्री खुली होणार आहे. शुक्रवार ९ जुलै २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल. या ऑफरसाठीचा प्राइस बँड ८२८ ते ८३७ रुपये प्रति इक्विटी शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. ही ऑफर १,१५,०८,७०४ इक्विटी शेअर्सपर्यंतची (“विक्रीसाठी ऑफर”) पूर्ण ऑफर असेल. या ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या हिश्शाचा समावेश आहे.
या विक्रीच्या ऑफरमध्ये लोकेश बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, जसम्रित प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड, जसम्रित फॅशन प्रायव्हेट लिमिटेड, जसम्रित क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड , जसम्रित कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड , इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड आणि इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड यांच्याकडून इक्विटी शेअर्सची विक्री आणि प्रदीप कुमार अगरवाल यांच्याकडून ४,८६,१२६ पर्यंत इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने माहिती पत्रकात म्हटलं आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून यात ५० टक्क्यांहून अधिक ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी १५ टक्क्यांहून कमी ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी ३५ टक्क्यांहून कमी ऑफर उपलब्ध नसेल.ऑफर ही केवळ विक्रीसाठी ऑफर असल्यामुळे कंपनीला या ऑफरमधून जमा होणारा निधी मिळणार नाही.
कंपनीचा प्रमुख व्यवसाय हा रस्ते क्षेत्रामध्ये ईपीसी व बीओटी प्रकल्पांचे सिव्हिल बांधकाम करणे हा आहे. कंपनीने २००६ पासून १०० हून अधिक रस्ते बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत. २६ जून २०२१ रोजीच्या कंपनीच्या माहिती पत्रकानुसार कंपनीच्या बीओटी प्रकल्पांपैकी त्यांचा एक ऑपरेशनल रस्ते प्रकल्प आहे, ज्याचे बांधकाम व विकास बीओटी (वार्षिकी) आणि एचएएमअंतर्गत कंपनीला १४ रस्ते प्रकल्प बहाल करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत, ४ प्रकल्प बांधकामांतर्गत आहेत आणि ५ प्रकल्पांचे बांधकाम अजून सुरू व्हायचे आहे.
कंपनीला राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम, पुल, लहान पुल (कल्व्हर्ट्स), उड्डाणपुल, विमानतळ धावपट्ट्या, बोगदे आणि रेल ओव्हर ब्रिजेस बांधण्याचाही अनुभव आहे आणि अलिकडेच कंपनीने रेल्वे क्षेत्रातही विस्तारीकरण केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times