भविष्यात शिवसेना-भाजपची युती पुन्हा होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न आज पत्रकारांनी विचारला असता फडणवीस यांनी थेट काही बोलण्याचं टाळलं आहे. राजकारणात ‘जर आणि तर’ला अर्थ नसतो. शिवसेना व भाजपमध्ये काही मतभेद असतील, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी फडणवीसांचं वक्तव्य योग्य असल्याचं सांगितलं. ‘गेल्या अनेक दिवसांपासून मी हेच बोलतोय. आमचे राजकीय मार्ग बदलले आहेत. पण नेत्यांमध्ये संवाद कायम आहे. शिवसेना-भाजप म्हणजे काही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यामध्ये भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असते,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
भाजप व शिवसेनेमधील बदललेल्या संबंधांबाबत बोलताना राऊत यांनी आमीर खान व किरण राव यांच्यातील घटस्फोटाचा दाखला दिला. आमीर आणि किरण रावचे यांनी आपले मार्ग बदलले आहेत. पण त्यांची मैत्री कायम राहणार आहे. तसंच आमचं आहे. राजकारणात संबंध राहतीलच. पण याचा अर्थ आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असा होत नाही,’ असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो असंही फडणवीस युतीबद्दल बोलताना म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, ‘परस्थिती आता काय आहे आणि उद्या काय होईल याबद्दल कुणीही भविष्य वर्तवू शकत नाही. पण आता जी व्यवस्था आहे, ती पुढील पाच वर्षे कायम राहील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार उत्तम चाललं आहे.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times