अकोला : जुलै महिना उजाडला असला तरी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. जिल्ह्यात अद्यापही 70 टक्के क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतित असून पुन्हा आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता टाळता येणार नाही.

यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दमदार पाऊस बरसणार व पिकेही चांगली होणार असल्याची प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. जिल्हात अधूनमधून थोड्याफार सरी कोसळतात. यामुळे काही प्रमाणात पिकाला जीवदान मिळत आहे. जिल्ह्यामध्ये 29 टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, जुलै महिना उजाडला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये 70 टक्के पेरण्या रखडल्या आहेत.

पावसाच्या अशा लंपडावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. येत्या दोन – चार दिवसांमध्ये पाऊस आला नाही तर पिके सुकून जातील. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मायबाप हा आस्मानी संकटात सापडला आहे.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत सारासरी पेक्षा 95.5 मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. आतापर्यंत 170 मिमी पाऊसाची अपेक्षा होती. पण 95.5 मिमी पाऊस पडल्याने 70 टक्के पेरण्या खोळंबल्या असून या दोन ते तीन दिवसात जर पाऊस पडला नाहीतर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध आहे तसेच शेतकरी पिकांना पाणी देऊन पिके जगवित आहे. परंतू कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातल्या ७ तालुक्यांमध्ये किती पाऊस झाला ?
अकोटमध्ये – 49.4 मिमी

तेल्हारामध्ये – 84.0 मिमी

बाळापूरमध्ये – 73.4 मिमी

पातूरमध्ये – 121.6 मिमी

अकोलामध्ये – 74.8 मिमी

बार्शीटाळळीमध्ये – 137.3 मिमी

मूर्तिजापूरमध्ये – 155.5 मिमी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here