नागपूर: निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती दडविल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले विरोधी पक्षनेते यांना आज नागपूर न्यायालयानं जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.

फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात १९९६ ते १९९८ दरम्यानच्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची आज नागपूर न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला हजर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार फडणवीस आज न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीनं अॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर सतीश उके यांनी विरोधात युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयानं मंजूर केला.

‘माझ्यावरील सर्व गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या आंदोलनांचे गुन्हे आहेत. वैयक्तिक कारणातून एकही गुन्हा आजवर माझ्यावर दाखल झालेला नाही. त्यामुळं कुठलेही गुन्हे लपवण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या दोन गुन्ह्यांबद्दल माझ्याविरोधात आरोप केले जात आहेत, ते निवडणुकीवर परिणाम करणारे गुन्हे नव्हते. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत मी ५० टक्क्यांच्या वर मतं घेऊन जिंकून आलोय. न्यायालयासमोर मी माझं म्हणणं मांडेन. न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी आज व्यक्त केली. ‘या सगळ्यामागे कोण आहे हेही मला चांगलं माहीत आहे, असं ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here