सिंधुदुर्ग : आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा गोंधळ झाला आणि भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं. यावरून माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षाचं होतं. महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पञकार परीषद घ्यायची असते मात्र ते पळून गेले. त्यांना कोणतही गांभीर्य नसल्यामुळे यांनी दोन दिवसाचं अधिवेशन ठेवलं. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

‘कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोक मृत्यूमुखी पडले. पण तरीदेखील त्याची चर्चा गांभीर्याने झाली नाही. मुख्यमंत्रीही यावर गंभीर नाहीत. इतकंच काय तर आपत्तीग्रस्थ शेतकऱ्यांचे पैसे अजून दिले नाहीत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. जो कॅबिनेटला जात नाही ना अधिवेशन घेत. आणि असा मुख्यमंत्री शरद पवार यांना चालतो?’ अशा कठोर शब्दात राणेंनी पवारांना सवाल केला आहे.

‘स्वप्निलच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार’
पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. स्वप्निल लोणकरच्या मृत्यूनंतर आता आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट बघत आहात? असा सवाल करत स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्याला नोकरी मिळाली असती तर तो आज जिवंत असता. त्याच्या या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार अशी गंभीर टीका राणेंनी केली.

राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– हे सरकार फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमवत आहे. यामुळे अनेक मंञ्याचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. अनिल परब, अनिल देशमुख अशा मंञ्यावर भष्टाचाराचे आरोप आहेत.

– सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचं निलंबन झालं.

– यांनी जरी बाराचं निलंबन केल तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत.

– ओबीसींचा इंपेरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून अधिवेशनात ठराव करता मग मोदींशी पंन्नास मिनिटे चर्चा कसली करत होता. आपल्या घरातील, पक्षातील कोणावर
कारवाई करू नका म्हणून का?

– हे सरकार फक्त आदित्यसाठी चाललं आहे का?, आदित्य सांगेल त्याच फाईलवर मुख्यमंत्री सही करतात

– हा भास्कर जाधव कुठे आहे कुठल्या पक्षात आहे शोधाव लागतं

– देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत. उद्या मुख्यमंत्री होतील

– अजित पवार यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर असून साखर कारखाने डबघाईला आणून तेच करखाने कमी किंमतीत विकत घेतले म्हणून ही कारवाई आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी हसून माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी आभार मानतो आणि असं काही घडो म्हणून तूमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पञ येत नाही आणि मी जोपर्यंत शपथ घेत नाही तोपर्यंत जरा धिर धरा’ असं राणेंनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here