मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी विधानसभेत राडा झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना थेट वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. अशात भाजप आमदार यांना बोलताना मध्ये टोकणाऱ्या सत्ताधारी आमदारांना अनिल देशमुख यांचा दाखल देत सुनावले. यावर आक्षेप नोंदवत मुनगंटीवारांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून ही धमकी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ( criticizes bjp leader )

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांचे सदस्य बोलत होते. मात्र भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलल्यामुळे अनिल देशमुख हे आतममध्ये जात आहेत असे मुनगंटीवार म्हणाल्याचे सांगत त्यांचे हे वक्तव्य धमकी देणारे असल्याचे पटोले म्हणाले. भाजपची आता सभागृहात धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार म्हणजे ईडी, आयकर आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाहक त्रास देत आहे याची कबुलीच आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-
भाजप हा सत्तेचा दुरुपयोग करत असून भाजपने महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून खेळत आहे. हे लोकशाहीला घातक आहे, असे नाना पटोले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या आजच्या कामकाज पत्रिकेवरच आक्षेप घेतला. फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलत असताना सत्ताधारी आमदारांनी सुधीर मुनगंटीवार यांना मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुनगंटीवार भडकले. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही, असा सवाल करत अनिल देशमुख हे देखील असेच मध्ये-मध्ये बोलत असत. आता ते आत जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मध्ये-मध्ये बोलू नका, असा टोला मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांना लगावला.

क्लिक करा आणि वाचा-
आपण हरकतीच्या मुद्द्यावर बोलत असून तो आपला अधिकार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही मध्येमध्ये बोलण्याचे काहीएक कारण नसून ही सरकारची चमचेगिरी असल्याचे वक्तव्यही मुनगंटीवार यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here