हरीश पिंपळे हे सलग तीन वेळेस मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आहेत. हरिश पिंपळे यांची निलंबनाची ही दुसरी वेळ आहे. विदर्भातील आमदार अधिवेशनात काहीच बोलत नाहीत. पण त्याला पिंपळे हे अपवाद आहेत. पिंपळे जेव्हा पहिल्यांदा आमदार निवडून आले होते तेव्हाही अधिवेशनात राडा घातल्याने त्यांना 3 दिवसांसाठी निलंबित केले होते. आज त्यांना पुन्हा 1 वर्षासाठी निलंबित केले आहे.
हरिष पिंपळे हे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या या निलंबनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अधिक माहितीनुसार, सर्व निलंबित आमदार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असून ते काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, निलंबित आमदारांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका आहे. सभागृहात भाजपचं बहुमत नसावं यासाठी १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर हा ठरवून रचलेला प्लॅन आहे. सभागृहामध्ये असा कोणताही गोंधळ झाला नाही, असं आमदारांचं म्हणणं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times