नवी दिल्लीः कोविन मंच ( ) म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) म्हणाले. पंतप्रधान मोदींनी कोविन जागतिक परिषदेला ( ) संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

करोनान मृत्यू झालेल्या सर्व देशातील नागरिकांना पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली. गेल्या शंभर वर्षात अशी महामारी जगाने पाहिली नाही आणि अशा आव्हानाचा सामना शक्तीशाली देशांनाही एकट्याने करता येणं ( Cowin To Be Mad ) अशक्य होतं, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. माणुसकी आणि माणसाच्या भल्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मिळून पुढे जायला हवं हा मोठा धडा या महामारीने शिकवला आहे. आपल्याला एकमेकांकडून शिकणं तसंच आपल्याला सापडलेली योग्य दिशा दुसऱ्याला दाखवणं अशा स्थितीत भाग आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

अनुभव, कौशल्य आणि संसाधने यांचे जागतिक पातळीवर सामायिकीकरण करण्याप्रती भारत कटिबद्ध आहे. महामारीशी लढताना तंत्रज्ञानाची मदत महत्त्वची आहे. सॉफ्टवेअर हे असे क्षेत्र आहे जिथे संसाधनांची कमतरता नाही. म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण शक्य झाल्याबरोबर भारताने आपलं कोविड ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजेच संसर्गाचा माग काढणारे आणि संसर्ग शोधणारे तंत्रज्ञान ओपन सोर्स केल्याचं पंतप्रधान म्हणाले. २०० दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे अॅप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध असल्याचे सांगितले. भारतात वापर होत असल्याने त्याचा वेग आणि दर्जा याबाबतची चाचणी प्रत्यक्ष झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी जगाला आश्वस्त केलं.

लसीकरणाला महत्त्व देत भारताने नियोजनात पूर्णपणे डिजिटल दृष्टीकोन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे लसीकरण झाल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टीने लोकांची सोय झाली आणि कोविडनंतर ग्लोबल जगात सहजता येईल. हा सुरक्षित, रक्षण करणारा आणि विश्वासपात्र पुरावा वापरून नागरिकांना आपलं लसीकरण केंव्हा कसं आणि कोणाकडून झाले हे खात्रीशीरपणे सांगता येईल. लसींच्या वापराचा माग आणि कमीत कमी नुकसान यासाठी डिजिटल दृष्टीकोन मदत करतो, असेही म्हणाले.

संपूर्ण जग एक असल्याच्या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरुन कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसेच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल, असंही ते म्हणाले.

आजची परिषद ही, या मंचाची जागतिक व्यासपीठावरून ओळख करून देण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. कोविनमार्फत काही दिवसांपूर्वीच एका दिवसात ९० लाखाहून अधिक लोकांना आणि याप्रकारे आतापर्यंत ३५ कोटींहून नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याशिवाय लसीकरणाचा पुरावा म्हणून कोणताही नाशिवंत कागद जवळ बाळगण्याची गरज नाही तर तो डिजिटल प्रकारे तयार होतो. कोविनसाठी इच्छुक असणाऱ्या देशांना आवश्यक असणारे बदल कोविनमध्ये करता येतील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. आपण ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या दृष्टीकोनातून मार्गक्रमण केल्यास माणुसकी नक्कीच महामारीवर मात करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here