आजच्या ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ६१ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १६ हजार ९६० इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १६ हजार ७४२ इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७१६ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ८६१, साताऱ्यात ही संख्या ८ हजार ०९०, रत्नागिरीत ५ हजार ५२८, रायगडमध्ये ४ हजार ७५५, सिंधुदुर्गात ४ हजार २४१, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ०३९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३२२ इतकी आहे.
यवतमाळमध्ये फक्त ५७ सक्रिय रुग्ण
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये ९९८, नांदेडमध्ये ही संख्या ५१३ इतकी आहे. जळगावमध्ये ८१९, तसेच अमरावतीत ही संख्या ३५२ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५७ इतकी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times