पुणे: ऑनलाइन क्लाससाठी पाठविलेल्या लिंकवरून कोणी तरी दुसऱ्याच व्यक्तीने शिक्षकांना शिवीगाळ केली. त्यावेळी एका मुलास तूच माझ्या नावाने शिक्षकांना शिवीगाळ केल्याचे म्हणत त्याला व त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना परिसरात घडली. याप्रकरणी ठाण्यात सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( )

वाचा:

याबाबत १६ वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे. तक्रारदार मुलगा हा कोंढव्यातील पारगेनगर भागात राहतो. तो १२ वीमध्ये शिकत आहे. सध्या त्याचे सुरू आहेत. त्यांना शिक्षक क्लाससाठी अगोदर एक लिंक पाठवितात. त्यावरून क्लासमध्ये सर्वजण सहभागी होतात. दोन दिवसांपूर्वी शिक्षकांनी लिंक पाठविल्यानंतर एका तरुणाच्या नावावर कोणी दुसरेच जॉइन झाले. त्याने शिक्षकांना शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपीने माझ्या नावाने तूच क्लासमध्ये सहभागी झाला आणि शिक्षकांना शिवीगाळ केली, असे म्हणत दमदाटी केली. तसेच, मुलाला एका ठिकाणी बोलविले. त्यावेळी मुलगा व त्याचा भाऊ त्या ठिकाणी गेले असता सहा ते सात जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी तक्रारदार यांच्या भावाला मारहाण केली. तसेच, तक्रारदार यांना दगडाने मारहाण केली. तसेच, याबाबत तक्रारदार हे पोलीस चौकीत निघाले असता तक्रार दिली तर जीवे मारण्याचीही धमकी त्यांनी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

वाचा:

दरम्यान, सध्या असल्याने शाळा आणि कॉलेज बंद आहेत. नवं सुरू झालं असलं तरी शिक्षण मात्र ऑनलाइनच घ्यावं लागत आहे. त्यात आधीच अनेक अडथळे येत असताना ऑनलाइन क्लासच्या लिंकचा अशाप्रकारे गैरवापर झाल्याचे प्रकरण समोर आल्याने त्याबाबतही आता सर्वांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीसोबतच शिक्षकाला शिवीगाळ कुणी केली याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here