मुंबई: रेल्वे प्रवाशांना सोयी-सुविधा पुरवायच्या तरी कशा, असा प्रश्न प्रशासनाला पडावा असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कारण, प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेनं सुरू केलेल्या ‘उत्कृष्ट’ गाड्याची समाजकंटक व चोरट्यांनी अक्षरश: दैना करू टाकली आहे. रेल्वेच्या ८० ‘उत्कृष्ट’ गाड्यांमधील स्टीलचे सुमारे ५ हजार नळ, २ हजार आरसे, ५०० सोप बॉक्स आणि ३ हजार फ्लश व्हॉल्व चोरीला गेले आहेत.

वाचा:

लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेत सुधारणा म्हणून ऑक्टोबर २०१८ साली रेल्वेनं ३०० ‘उत्कृष्ट’ गाड्यांची सुरुवात केली. त्यासाठी तब्बल ४०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. एलईडी दिवे आणि दुर्गंधीमुक्त वॉशरूम अशा वैशिष्ट्यांसह सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सुविधा या गाड्यांमध्ये देण्यात आल्या होत्या. मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे ८० गाड्यांतील अत्याधुनिक सुविधांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे चोरट्यांनी टॉयलेट पॉटवरील कव्हरही सोडलेले नाहीत.

एका उत्कृष्ट गाडीसाठी रेल्वेनं जवळपास ६० लाख रुपये खर्च केले आहेत. गाडीतील एक आरसा ६०० रुपयांचा तर नळ १०८ रुपयांचा होता. चोरीच्या प्रकारामुळं मध्य रेल्वेला १५.२५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. तर, पश्चिम रेल्वेचं ३८.५८ लाखांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती एक रेल्वे अधिकाऱ्यानं ‘मुंबई मिरर’ला दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here