ठाणे शहराचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.७६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल १ हजार ६६ दिवसांवर गेला आहे. ठाण्यात आज करोनाच्या २ हजार ६८४ चाचण्या करण्यात आल्या.
क्लिक करा आणि वाचा-
ठाणे शहरात आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ८२७ जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार ८३१ रुग्ण बरे झाले आहेत. ठाण्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ५३ हजार ६६४ इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ठाण्यातील करोनाची आजची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ९७
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – १०४
बरे झालेले एकूण रुग्ण – १.३०,८३१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७.७६%
एकूण सक्रिय रुग्ण- ९७३
रुग्ण दुप्पटीचा दर- १,०६६ दिवस
कोविड वाढीचा दर ( आठवडाभराचा)- ०.०७ %
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times