वाचा:
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवसांपूर्वी करोना चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः समाज माध्यमातून माहिती दिली आहे. सूर्यवंशी यांची प्रकृती चांगली असून ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. आपली प्रकृती चांगली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.
दरम्यान, क्षेत्रात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. विशेष करून सांगली शहरात मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यातही चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अविरत प्रयत्न करत आहे. मात्र, साथ अजून नियंत्रणात आलेली नाही.
वाचा:
अशी आहे करोनाची सोमवारची राज्यातील स्थिती:
– राज्यात ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
– २४ तासांत ६,७४० नवीन रुग्णांचे निदान तर १३,०२७ रुग्ण बरे होऊन परतले घरी
– राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ % एवढा.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
– राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १६ हजार ८२७ इतकी.
– सांगली जिल्ह्यात १० हजार ८६१ सक्रिय रुग्ण. महापालिका क्षेत्रात २४ तासांत ११६ तर जिल्ह्यात ५९६ नवे रुग्ण.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times