ठाणेः आटगांव स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रेल्वे रूळांवर गॅस टँकर अडकल्यानं कल्याण- कसारा रेल्वे वाहतूक खोळंबली होती. पोलिस आणि रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी उपस्थित झाल्यानं मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना टळली आहे.
कसारा-नाशिकहून मुंबईकडे वेगात जाणारा गॅस टँकरचा टायर फुटून अपघात झाला. गॅस टँकर दुभाजक तोडून थेट आटगाव- आसनगाव दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर गेला. यावेळी रेल्वे रूळांवरुन कोणतीही ट्रेन जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा गॅस टँकर तुर्भेयेथे गॅस भरण्यासाठी जात होता. भरधाव वेगात जात असतानाच टँकरचा टायर फुटला व त्यामुळं चालकाचे टँकरवरचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. टँकर रेल्वे रूळांवर आल्यानं काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times