मुंबई: लोकल गाड्यांमध्ये वाद आणि मारहाणीच्या घटना नेहमीच घडत असतात. जागा दिली नाही किंवा धक्का लागला, हे एवढं कारण त्यासाठी पुरेसं ठरतं. हार्बर मार्गावरील एका लोकलमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात तरुणांचं एक टोळकं मिळून एकाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते पनवेल लोकलमधील ही घटना आहे. बेलापूर स्थानकात गाडी पोहोचण्याआधी हा राडा झाल्याचं बोललं जातंय. मारहाण करणारे संबंधित तरुणावर शिव्यांच्या भडिमारही करत आहेत. त्यामुळं डब्यातील महिला पोलिसांना बोलावण्याची मागणी करताना दिसत आहेत. नेमका वाद कशामुळं झाला? त्यात कोणाची चूक होती? यापैकी काहीही समजू शकलेलं नाही. या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पनवेल रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here