मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याचे पडसाद सभागृहात उमटले होते. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विधान परिषदेच्या सभागृहातही विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाची मागणी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे दिवसभरात आरक्षणासाठी सहा वेळा; तर सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणखी दोनदा कामकाज तहकूब करावे लागले.
अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची चर्चा आहे. तर, सत्ताधारी पक्ष वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याकडे लक्ष असणार आहे.
– केंद्र सरकारने महिन्याला तीन कोटी लस उपलब्ध करुन द्या; सत्ताधारी पक्ष आज ठराव आणणार
– विधिमंडळात कृषी कायद्याबाबत ठाराव मांडणार असण्याची शक्यता
– वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करणार
– १२ आमदारांच्या निलंबनाचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times