वाचा:
स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी एमपीएससी व राज्य सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे’ असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच ‘एमपीएससी’ परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल,’ अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली होती.
केवळ फेसबुक पोस्टवरच न थांबता, अमित ठाकरे यांनी आज सकाळी थेट गाठले. पुण्यात ते स्वप्नीलच्या आईवडिलांची भेट घेणार आहेत.
नेमकं काय झालं होतं?
स्वप्नील लोणकर हा तरुण एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, दीड वर्षांपासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये सुद्धा त्यानं एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. हे सगळं कधी होणार आणि नोकरी कधी मिळणार? या तणावातून त्यानं २९ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या मायाजालात अडकू नका, असं आवाहनही त्यानं सुसाइड नोटमधून केलं होतं.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times