जळगाव: जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. यावर्षी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून महिन्यात फक्त २० ते २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही पूर्वहंगामी कापसाची लागवड अधिक आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात तर करावी लागणार आहे. ( Rain)

जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून महीना संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात मका, उडीद, मूग व सोयाबीन लागवड देखील सुरू झाली होती. आता पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग व उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. येत्या काही दिवसात उडीद देखील जळून जाण्याची भिती आहे.

वाचा:

गेल्या वर्षी जून महिन्यात मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुमारे ३५ ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यावर्षी मान्सून लांबणीवर पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबला तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची भीती आहे.

लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड

जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगामाचे एकूण लागवड क्षेत्र हे साडेसात लाख हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्या खालोखाल मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन तसेच उडीद व मूगाची लागवड होते. आतापर्यंत जिल्ह्यातील सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. पावसाअभावी हंगामी कापसाच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. आता पाऊस झाल्यानंतरच ही लागवड होणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here