मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं. यावरू भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. हे सोंगट्यांचं सरकार असून ही एकाच तालमीतली माकडं असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले की, माझ्या सहकारी असलेल्या १२ आमदरांनी कोणालाही शिवीगाळ. पण मुख्यमंत्र्यांसह सगळेचजण घाबरले आहेत. त्यामुळे हे ठरवून रचलेलं नाटक असल्याची टीका नितेश राणे यांच्याकडून करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. हे शेंबड्यासारखे आहेत म्हणून १२ आमदारांना निलंबित केलं अशा शब्दात नितेश राणे यांनी आरोप केले आहेत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सरकारची काय रणनीति आहे असा सवालही यावेळी राणेंनी विचारला आहे.

दरम्यान, कितीही आमदार निलंबित केले तरी आम्ही लढणार आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या आमदारांवर कारवाई करता येत नाही म्हणून आमचे आमदार निलंबित केले. पण त्यांना आदित्यशिवाय कोणी दिसत नाही. आदित्यच्या मताशिवाय त्यांनी कोणीही मत देणार नाही अशी गंभीर टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here