२०१६-१७ मध्ये मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काहीच काम नव्हतं. मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव अमजाद खान नाव ठेवण्यात आलं होतं. केंद्रातले सध्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पीएचा नंबरदेखील व खासदार संजय काकडे यांचा नंबरपण टॅप केला गेला. कोणाच्याही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कोणाला नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
वाचाः
यावेळी नाना पटोले यांनी आपल्याला मुसमानांचीच नावं का टाकली?, असा सवाल केला आहे. त्याऐवजी माझंच नाव टाकायला हवं होतं. या पद्धतीने हिंदू- मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने राजकारण करुन राज्य पेटवायचं हा उद्देश होता का?, असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे. तसंच, माझ्यावर व जितक्या लोकांचे फोन टॅप झाले त्यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला होता. कोणाचे फोन टॅप केले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.
वाचाः
दरम्यान, कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्याप्रकरणावरुनही आज सभागृहात चर्चा झाली. नाना पटोले यांनी राजू साप्ते यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप असलेली व्यक्ती अटक केली आहे. ही व्यक्ती ज्या संघटनेशी संबंधित आहे तिथे भाजप नेत्याचं नाव समोर आलं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नाना पटोलेंनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंगच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची उच्च स्तरिय चौकशी करुन सभागृहाला माहिती देण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times