मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी व तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळं संतापलेल्या भाजपनं आज विधान भवनाच्या आवारात प्रति विधानसभा भरवत सरकारचा निषेध केला. त्यानंतर अधिकच आक्रमक झाली असून भाजपच्या इतर आमदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री यांनी केली आहे.

वाचा:

विधानसभेत आज जयंत पाटील यांनी ही मागणी केली. ‘याआधीच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो, मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात असं वर्तन केलं नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीचे वर्तन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ‘आज विधानसभेच्या कामकाजात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहेत हे अयोग्य आहे, असंही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिलं.

वाचा:

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मागवण्यासंदर्भात एक ठराव सत्ताधारी पक्षानं संमत केला. त्यावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घातला. अध्यक्षांसमोरील माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे, तालिका अध्यक्ष यांच्या दालनात जाऊन विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. यावरून १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याचा निषेध म्हणून भाजपनं आज विधान भवनाच्या पायऱ्यावर प्रति विधानसभा भरवली. भाजपच्या या वर्तनास जयंत पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here