अकोला : मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत नेहमीच सामाजिक दायित्व निभावत आले असून नोट बंदीच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे पैसे नव्हते, तेव्हाही मुरलीधर राऊत यांच्या मराठा हॉटेलमध्ये ‘जेवण करून घ्या पैसे परत येताना द्या’ हा उपक्रम चालवला होता. या उपक्रमाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः ‘मन की बात’मधून कौतुक केले होते.

मुरलीधर राऊत हे नेहमीच सामाजिक जाणीव जपत कार्य करत असून त्यांनी कोरोनाच्या संकट काळात आत्महत्याग्रस्त शेतकरी 40 कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लावून दिले. ही जबाबदारी एक मोठा विचार मांडणारी आहे. आता हे मराठा हॉटेल पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. ते म्हणजे, कोरोना काळात ज्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरविले आहे, अशा पाल्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मराठा हॉटेलने घेतली आहे.

लहान मुलांना 20 वर्षांपर्यंत हजार रुपये महिना आणि त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी मुरलीधर राऊत यांनी आता उचलली आहे. बाळापूर तालुक्यातील ज्यांनी आई-वडिलांचे छत्र हरवलेलं आहे अशा दहा मुलांचे ते आता आई-वडील झाले आहेत. त्यांच्या या कार्याची सुरवात त्यांनी त्यांच्या वाढदिवसासाच औचित्य साधून केली आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सन्मानपूर्वक या मुलांना हजार रुपयांचा धनादेश दिला.

मराठा हॉटेलचे मालक गरिबांचे मायबाप
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मुरलीधर राऊत यांनी आपल्या हॉटेलच्या कमाईतून समाजकार्य करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या कोरोनाच्या महामारीत माणुसकी हरपल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अनेकांनी या कोरोना काळात आपली जवळची माणसं गमावली. कोणी आई-बाप तर कोणी आपली मुलं गमावली. या कोरोनामुळे प्रत्येकाचं जीवन विस्कळीत झालं होतं.

अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेक लोक बेघर झाली . काही काळ गेल्यानंतर अनेकांचं जीवन थोडं सावरत गेलं. पण आता तोच मदतीचा हात अनाथ झालेल्या मुलांसाठी पुन्हा समोर येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here