विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री हे पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
लाइव्ह अपडेट्स:
- आरोग्य खात्याची कुठलीही पदं रिक्त ठेवायची नाहीत असा निर्णय सरकारनं घेतला आहे – उद्धव ठाकरे
- विरोधकांनी कितीही मागण्या केल्या तरी आम्ही लोकांच्या जिवाशी खेळणार नाही. सर्व परिस्थिती पाहून निर्बंधांचा निर्णय घेऊ – उद्धव ठाकरे
- ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही ठराव केला तर बिघडलं काय? – उद्धव ठाकरे
- डेटामुळं आरक्षण मिळणार नाही असं तुमचं म्हणणं होतं तर ठीक आहे. ते नंतर बघता आलं असतं. तुम्ही पाठिंबा देऊन मोकळं व्हायचं होतं. इतकं आकांडतांडव करण्याची गरज काय होती?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागवण्याचा ठराव विधानसभेत केला, त्यात चुकीचं काय? एवढ्या मिरच्या झोंबण्यासारखं काय आहे?; विरोधकांच्या गदारोळावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- बाळासाहेब थोरात यांच्या ३७ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांनी हा अनुभव घेतला. तेही अवाक् झाले – उद्धव ठाकरे
- विधिमंडळात काल जे काही घडलं ते लाजिरवाणं होतं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही: मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत विरोधी पक्षावर निशाणा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद. उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती
- विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times