मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. या अधिवेशनात आज तीन कृषी विधेयके मांडण्यात आली. या वेळी बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी हे देशाचे अन्नदाते आहेत. हे अन्नदाता असलेले शेतकरी शत्रू आहेत का, की ते पाकिस्तानातून आले आहेत, असा असे सवाल करत आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी कितीसा वेळ लागतो, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. (are farmers the enemies of the country or are they from pakistan ask )

केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात चीन कृषी विधेयके आणली .या विधेयकांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिल्लीत लाखो करत आहेत आणि या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. या आंदोलनादरम्यान करोनामुळे, तसेच इतर कारणांमुळेही अनेक आंदोलक शेतकरी मृत्युमुखी पडले. एका व्यक्तीचा मृत्यू झाला तरी आपण संवेदना व्यक्त करत असतो. मात्र येथे तर २०० हून अधिक बळी गेले आहेत. मात्र दुर्दैवाचा भाग म्हणजे मंत्री यायचे, चर्चा करायचे आणि निघून जायचे, अशा शब्दांत भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

क्लिक करा आणि वाचा-
शेतकऱ्यांचे हे आंदोलन गेल्या ७ महिन्यांपासून सुरू आहे. दोन-चार दिवसांचे आंदोलन किती त्रासदायक असते याची आपल्याला कल्पना आहे. मग हे आंदोलक शेतकरी काय आपले दुश्मन आहेत का?… ते पाकिस्तानातून आले आहेत का?, असे सवाल करतानाच या देशात खायला अन्न नव्हते हे मी स्वत: पाहिले आहे. अमेरिकेहून लाल गहू यायचा. तो आपण खाल्ला. वसंतराव नाईक यांनी घोषणा करत कृषी क्रांती आणली. आपल्या शेतकऱ्यांनी परिश्रम करत सव्वाशे कोटी देशवासीयांची भूक तर भागवलीच, पण इतर २५ देशांच्या अन्नाची गरज देखील या देशांनी भागवली, असे भुजबळ म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here