: जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्यावरून दाखल गुन्ह्यात फरारी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. तब्बल ३६३ दिवस पोलिस बऱ्हाटेच्या मागावर होते. त्यानंतर अखेर आज त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन याच्यासह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी बऱ्हाटेच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून त्याची पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली होती. त्यांनतर बऱ्हाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी राज्याच्या विविध भागांसह गुजरात, राजस्थान येथे शोध मोहीम राबवली होती.

बऱ्हाटे याच्यावर ‘मकोका’नुसार कारवाई केली आहे. त्याच्या टोळीवर एकूण १२ गुन्हे दाखल असून, सध्या त्याच्यासह काही साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here