मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी महाविकास आघाडी सरकारला कौरवांची उपमा देत टीका केली आहे. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (opposition leader criticizes )

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडताना फडणवीस यांनी महाभारताचा दाखला दिली. पांडवांनी कौरवांकडे केवळ सात गावे मागितली होती. पण सुईच्या टोकाइतकीही जागा देणार नाही, असे दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो?… याचा अर्थ दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता, असे सांगत दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारल देखील शिगेला पोहोचला आहे. हे सरकार डोक्यात अहंकार घेऊन आलेले आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दुशासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोले लगावले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवताना फडणवीस पुढे म्हणाले की, सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे हे समजून घ्यायचो. आता मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी आले नाही. याचे कारण म्हणजे यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक अधिक काळ टिकत नाहीत.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी फडणवीस यांनी विधानभवन परिसरात भरवलेल्या प्रतिविधानसभेबाबतही उल्लेख केला. 12 आमदारांवर केलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ ही प्रतिविधानसभा भरवली गेली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेच्या माध्यमातून सरकारचा बुरखा फाडला आहे. तसेच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्याचे काम केले असून शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

‘कृषी कायदे न फेटाळता सुधारणा सुचवल्या हे चांगले झाले’

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी कृषी कायद्याबाबतही आपले मत मांडले. राज्य सरकारने तीन कृषी कायदे आज सभागृहात मांडले. आघाडी सरकारने कृषी कायदे फेटाळले नाहीत हे चांगले झाले. कृषी कायद्यात त्यांनी काही सुधारणा सूचवल्या असून ते अपेक्षितच होते, असे फडणवीस म्हणाले. या तीन कायद्यांपैकी दोन कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात असल्याचेहीते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here