अनुप्रिया पटेल, पंकज चौधरी, रिटा बहुगुणा जोशी, रामशंकर कठेरिया, वरुण गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, आरसीपी सिंह, लल्लन सिंह, पशुपती पारस, राहुल काँस्वा, सी. पी. जोशी आणि सर्वानंद सोनोवाल यांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यापैकी रामशंकर कठेरिया सोडून इतर सर्वजण दिल्लीत दाखल झाले आहेत. कठेरिया हे संध्याकाळी येणार असल्याचं सांगण्यात आलं. आरसीपी सिंह हे चर्चेसाठी आले आहेत. शपथविधीसाठी नाही, असं जेडीयूच्या सूत्रांनी सांगितलं आहे. अनुप्रिया पटेल, सर्वानंद सोनोवाल आणि रामशंकर कठेरिया हे यापूर्वीही मोदी सरकारमध्ये मंत्री होते. तर काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे हे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.
अनुप्रिया पटेल या अपना दलाच्या नेत्या आहेत. पशुपती पारस हे लोक जनशक्ती पार्टी आणि लल्लन सिंह हे जेडीयूचे नेते आहेत. हे सर्व पक्ष एनडीएतील घटकपक्ष आहेत. एकहून अधिक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मंत्र्यांचा बोजा या मंत्रिमंडळ विस्तारने कमी होईल. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान दिलं जाईल. निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना हटवलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार पुढच्या वर्षी होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात असल्याचं बोललं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times