कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर कायम आहे. रोज दीड हजारावर पॉझिटिव्ह रूग्ण आढळत असतानाच आता निर्बंध शिथील केल्याने रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी तब्बल सतराशेपेक्षा अधिक रूग्ण आढळले. यातच आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सरसकट सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Corona patients are on the rise in Kolhapur)
कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यापासून करोनाचा कहर कायम आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यातील रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. याउलट कोल्हापूर ,सातारा आणि सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषता दोन महिन्यातील केवळ एक दोन दिवस वगळता एकही दिवस रूग्णसंख्या हजाराच्या खाली आली नाही. रोज दीड हजारावर रूग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाबाधित मृत्यूंची संख्याही या जिल्ह्यात कमी नाही. रोज तीसपेक्षा अधिक लोकांचा बळी जात आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी रोज आढळणारे रूग्ण जास्त असल्याने चिंता वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. चार कोटीपेक्षा अधिक दंड केला. पण रस्त्यावरील गर्दी हटत नसल्याने करोनाला रोखणे मुश्किल होत आहे.
तीन महिने जिल्ह्यात अत्यावश्क सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. पण कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक होत दुकाने उघडण्याचा निर्धार केला. काहीही कारवाई करा, आम्ही दुकाने उघडणारच अशी भूमिका त्यांनी घेतली.त्यामुळे सरकारने नमते घेत सहा दिवसासाठी निर्बंध हटवले. यामुळे सोमवारपासून शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडण्यात येत आहेत. याच पद्धतीने इचलकरंजी शहरातील व्यापारीदेखील आक्रमक होत आहेत. शनिवारपासून तेही दुकाने उघडणार आहेत. यामुळे मात्र प्रशासनाची कोंडी होत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
निर्बंध असताना जिल्ह्यात रोज दीड हजारावर रूग्ण आढळत होते. आता तर ते शिथील केल्याने रस्त्यावर आणि दुकानात, बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. नियम पाळण्यातही नागरिकांनाकडून हयगय होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पॉझिटिव्हिटी दर पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील दुकाने सुरू करा
आक्रमक होवून व्यापाऱ्यांनी कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. हा लढा यशस्वी झाल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. तशी परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
जुलैमध्ये आढळलेले रूग्ण व मृत्यू
१ जुलै १५२२ , २९
२ जुलै १७१६, ३३
३ जुलै १७७६, ३२
४ जुलै १९५१, २७
५ जुलै १६७५, २७
६ जुलै १७७६ , २४
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times