आजच्या १७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २९७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ६७० इतका आहे. तर, ठाण्याच्या खालोखाल पुण्यात एकूण १६ हजार ५२४ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १२ हजार ९८८ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ८७०, साताऱ्यात ही संख्या ७ हजार २७१, रत्नागिरीत ५ हजार ०८३, रायगडमध्ये ४ हजार ५१७, सिंधुदुर्गात ४ हजार ०८६, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ६५९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३१९ इतकी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times