मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली आहे. आज गेल्या २४ तासात ४५३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात ४८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६ लाख ९९ हजार ८२३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (mumbai registered 453 new cases in a day with 482 patients recovered today)

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८२२ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

आजची रुग्णसंख्या गेल्या काही महिन्यांमधील निचांकी

मुंबईत गेल्या २४ तासांत ४५३ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली असून गेल्या काही महिन्यांतील ही निचांकी रुग्णसंख्या असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता ७ हजार ९०८ पर्यंत खाली आली आहे.

मुंबईत आज ३० हजार ५५४ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३० हजार ५५४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये १३ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ७४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ४५३
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९९८२३
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७९०८
रुग्ण दुपटीचा कालावधी- ८२२ दिवस
कोविड वाढीचा दर ( २९ जून ते ०५ जुलै)- ०.०८ %

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यात आज ६० नवे रुग्ण
तसेच, ठाणे शहरात आज दिवसभरात एकूण ६० नवे रुग्ण आढळले असून एकूण ८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज ठाण्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच आतापर्यंत ठाण्यात एकूण २ हजार ०२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार ९१६ रुग्ण बरे झाले आहेत.

आज दिवसभरात ठाण्यात एकूण ३ हजार ३९० कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण १७ लाख ५७ हजार ०५४ इतक्या चाचण्या करण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळवले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here