सनमडीकर यांनी भारतीय सैन्यदलात शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केले. १९८५ साली जत विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर ते १९६२ साली सैन्यात दाखल झाले होते. भारतीय सैन्यदलातील शिपाई ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. १९८५, १९९० आणि २००४ साली असं तीन वेळा ते आमदार झाले. त्यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.
जत साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्याशिवाय सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी पाच आश्रमशाळा उभारून गोरगरिब नागरिकांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडली. तेथे पॉलिटेक्निक, इंग्लिश मेडियन स्कूल,नर्सिंग कॉलेज अशा संस्था उभारून तालुक्यातील हाजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. म्हैसाळ सिंचन योजनेसह तालुक्यातील अनेक विकासकामे खेचून आणून त्यांनी तालुक्यातील विकासाला महत्व दिले होते.
दरम्यान, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या निधनानंतर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times