हॉगने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आता कार्तिकचे शेजारी हाय अलर्टवर आहेत.’ हॉगच्या या ट्विटवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. तसेच कार्तिकला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावेळी कार्तिकने समालोचक म्हणून नव्या इनिंगला सुरवात केली आहे. आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे.
भारतीय संघाचा भाग नसला तरी कार्तिकला करिअरचा आणखी एक पर्याय मिळाला आहे. पण कार्तिक आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सप्टेंबरमध्ये सुरवात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी कार्तिक महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या हंगामात केकेआर संघाची कामगिरी खराब झाली होती, परिणामी, कार्तिकला कर्णधारपदाला रामराम ठोकला होता. यंदाही आयपीएलच्या पहिल्या हंगामात तो काही कमाल दाखवू शकला नाही.
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केकेआरचा संघाने 7 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे. आणि गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times