याबाबत सविस्तर वृत्त असे की, सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान दारव्हा शहर पोलिसांनी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील युवकांना पकडून आणले त्यांना नेमकी कुठल्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले याबाबत मात्र नेमकी माहिती मिळू शकली नाही. या युवकांना पोलिसांनी पकडून आणल्यानंतर तीनही युवकांना जबर मारहाण केल्याने यातील शेख इरफान शेख शब्बीर वय (वर्ष 27) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर बोलले जात होते.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांच्या मारहाणीत या झाल्याने संतप्त जमावाने येथील पोलिस स्टेशनवर दगडफेक केली असून शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times