काबूल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचा दांडगा अनुभव असेलल्या रशिद खानकडे आता संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी रशिदने या गोष्टीसाठी नकार दिला होता, पण आता त्याने हे कर्णधारपद स्विकारले आहे.

अफगाणिस्तानचा आघाडीचा युवा फिरकीपटू रशिद खानकडे टी-20 संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर डावखुरा फलंदाज नजीबुल्ला झादरान हा संघाचा उपकर्णधार असेल.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “टीम अफगाणिस्तानचा टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून फिरकीपटू रशिद खानची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नजीबुल्ला झादरानला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आलं आहे. क्रिकेट विश्वात जागतिक पातळीवर अफगाणिस्तानचा चेहरा असलेल्या रशिदचा अनुभव, उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्व कौशल्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी राशिदने दिला होता नकार
टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रशिदने याआधी संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. कर्णधारपेक्षा एक खेळाडू म्हणून ते संघासाठी महत्त्वाचे आहेत, असे रशिदने म्हटले होते. 22 वर्षीय राशिदला जुलै 2019मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, पण वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा पराभव झाल्यामुळे डिसेंबरमध्ये असगर अफगानने त्याची जागा घेतली.

कर्णधारपद मिळाल्यानंतर राशिद म्हणालाएक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असतो, अशी मला खात्री आहे. अफगाणिस्तानने मला नाव दिले आणि आता देशाची आणि संघाची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे धन्यवाद. हा एक स्वप्नवत प्रवास आहे आणि माझ्या चाहत्यांची साथ महत्त्वापूर्ण ठरेल.

अफगाणिस्तान आणि भारत एकाच गटामध्येटी-20 विश्वचषक 2021 च्या ब गटामध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. उर्वरित दोन संघ क्वालिफायरद्वारे निवडले जातील. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतातून युएईमध्ये हलविण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here