म. टा. प्रतिनिधी, जळगावः भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री यांचे जावई यांना भोसरी भूखंडप्रकरणी इडीकडून काल रात्री अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ गिरीश चौधरी यांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल मात्र विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता.

भाजपाकडून अन्याय होत असल्याचे सागंत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानतंर भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता भोसरी भूखंड प्रकरणी त्यांचे जावई गिरीश चौधरी यांचीही ईडीने चौकशी केली. चौकशीनतंर गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. खडसे कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी सातत्याने भाजपासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ, असे आव्हानही दिले होते.

गिरीश चौधरी खडसेंचे जावई

गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांच्या कन्या शारदा खडसे-चौधरी यांचे पती आहेत. काही वर्षांपूर्वी ते परदेशात वास्तव्याला होते. अलीकडे ते भारतात राहत आहेत. खडसे यांनी २०१६ मध्ये पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील ३ एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गिरीश चौधरी चर्चेत आले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here