मुंबई: ज्येष्ठ अभिनेते यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या त्यांच्या स्नेहसंबंधांना उजाळा दिला आहे. ()

‘भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला. सिनेमाच्या पडद्यावर अनेक भूमिका अजरामर करणाऱ्या दिलीप कुमार यांचे सिनेप्रेमींच्या व चाहत्यांच्या हृदयातील स्थान अढळ राहील,’ अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

वाचा:

‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व विलक्षण होतं. चित्रपटसृष्टीचा रुबाब त्यांनी आपल्या नेहमीच्या जगण्यातही वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे.

वाचा:

‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दिलीपजींचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता,’ असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

दीपस्तंभ ढासळला – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘दिलीप कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘ट्रॅजेडी किंग’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं ‘दिलीपकुमार’ बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here