मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. दिलीप कुमार यांची लोकप्रियता किती होती आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्या काळात लोक किती धडपडायचे याचा दाखला शरद पवार यांनी स्वत:चं उदाहरण देऊन सांगितला आहे.

ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘दिलीपकुमार आपल्यात राहिले नाहीत. पण माझ्या नजरेसमोर त्यांच्या अनेक आठवणी आहेत, असं सांगून, पवारांनी पुण्यातील त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. ‘मी शाळेत असताना पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या जेजुरी इथं ” चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे असं आम्हाला कळलं. हे कळताच शूटिंग बघण्यासाठी आम्ही सायकलवरून तिथं गेलो होतो. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहण्याची संधी मिळाली,’ असं पवारांनी सांगितलं. ‘नंतरच्या काळात विधिमंडळात व राज्य सरकारमध्ये काम करताना दिलीप कुमारांचं आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते आग्रह करून एखाद दुसरी सभा घेण्यासाठी येत असत. राजकारणाच्या व्यतिरिक्तही मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असे. त्यामुळंच त्या वेळच्या राज्य सरकारनं त्यांची नियुक्ती मुंबईच्या शेरीफ पदावर केली होती. त्या काळात मुंबईच्या विविध प्रश्नांमध्ये त्यांनी लक्ष घातलं. सगळ्या घटकांचे संबंध चांगले राहतील याची काळजी घेतली, असं पवार म्हणाले.

वाचा:

‘दिलीप कुमार यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरती मर्यादित नव्हती. परदेशातही ते लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत एकदा आम्ही दक्षिण आशियामधील इजिप्त, सीरियामध्ये गेलो होतो. तिथं त्यांना पाहण्यासाठी तरुण मंडळी मोठी गर्दी करायची, अशी आठवणही पवारांनी सांगितली.

‘अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती बरी नव्हती. मी स्वत: त्यांच्या घरी जाऊन सायराजींची भेट घेतली होती. दिलीपजींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दिलीप कुमार यांच्या जाण्यानं कलेच्या क्षेत्राचं अपरिमित नुकसान झालंय. त्यांच्याबद्दल आस्था असलेल्या लोकांसाठी हा क्षण यातना देणारा आहे. दिलीप कुमार यांना जे आयुष्य मिळालं, त्या आयुष्यात त्यांनी कलेची अखंड सेवा करण्याचं काम केलं. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणं हीच त्यांना योग्य श्रद्धांजली असेल. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,’ असं पवार म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here