यावेळी आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पंचायत आदि विभागांचा आढावा घेण्यात आला. मात्र, पंचायत विभागावरच सभा गाजली. अनेक ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये अजूनही शौचालय बांधकामाची निधी जसेचेतसे जमा असून ती निधी खर्च न झाल्याने त्यांनी संबंधित ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, जि.प. सदस्य रवींद्र शहा, पंचायत समीतीचे सभापती सुवर्णा येमुलवार, उप सभापती प्रगती बंडावार आदी उपस्थित होते.
यानंतर प्रशासकाच्या कार्यकाळात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमाप खरेदी झाल्याचे निदर्शनास आल्यावर पुरवठादारकाचे नाव, बिल आणि कॅशबुकची मागणी केली. मात्र, संबंधित कर्मचारी दस्तऐवज दाखवू शकले नाही. त्यामुळे अध्यक्षांनी त्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तालुक्यात एकूण 16 ग्रामपंचायती असून केवळ मोजक्याच ग्रामसेवकांकडे तीन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यावर कार्यालयात जमा असलेल्या ग्रामसेवकांना तात्काळ ग्रामपंचायतीवर पाठवून भारमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण तात्काळ करण्याचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुद्दत संपली होती. अश्या ग्रामपंचायतींची निवडणूका करोनामुळे उशीरा घेण्यात आले. त्या कालावधीत प्रशासक नेमण्यात आले होते. अनेक ग्रामपंचायतीमध्ये 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चात अनियमितता आढळली असून नियोजनात नसताना जिल्हा परिषदेची मंजुरी नसताना अमाप खर्च झाल्याचे त्यांनी आरोप केले. एवढेच नव्हेतर या सर्व बाबींची समितीद्वारे चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times