मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते () हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा फोल ठरली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असलेल्या संभाव्य नेत्यांच्या यादीत फडणवीस यांचा समावेश नाही. त्यामुळं तूर्त तरी फडणवीस हे महाराष्ट्रातच राहणार असून राज्यातील भाजपचं राजकारण त्यांच्याच भोवती केंद्रित असेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

वाचा:

यांच्या लाटेत २०१४ साली महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर अनपेक्षितपणे फडणवीस यांना राज्यात मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी पाच वर्षे कारभार केला. शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष सोबत असतानाही सरकारवर भाजपची छाप राहील याची खबरदारी फडणवीस यांनी घेतली. भाजपच्या केंद्रातील नेत्यांशीही त्यांचे सूर चांगलेच जुळले होते. मात्र, २०१९ साली शिवसेनेसोबत झालेल्या सत्तावाटपाच्या वादामुळं अनपेक्षितपणे भाजपला सत्तेपासून दूर व्हावं लागलं. त्यामुळं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदही हुकलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असतानाही राज्यातील सरकार तुलनेनं स्थिर आहे. साहजिकच भाजपला आता पुन्हा सत्तेत परतण्याची संधी कमी आहे.

वाचा:

(Uddhav Thackeray) व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दिल्लीतील भेटीनंतर शिवसेना-भाजपची जवळीक पुन्हा वाढू लागल्याची चर्चा आहे. राजकीय उलथापालथ होऊन राज्यात युतीचं सरकार पुन्हा आलं तरी शिवसेना मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यासारख्या हुशार नेत्याला राज्यात ठेवणं भाजपला परवडणार नाही. त्यामुळं फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आज होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून फडणवीसांचं नाव कुठेही नाही. त्याऐवजी, माजी मुख्यमंत्री , खासदार कपिल पाटील, भारती पवार यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळं राज्यात भाजपचं नेतृत्व फडणवीस हेच करणार हे आता स्पष्ट झालं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here