मुंबई: भष्ट्राचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसमध्ये काहीसे झाकोळले गेलेले काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष, आणि राज्यमंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित होते. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेल्या नेत्यांपैकी प्रमुख नेते असलेले कृपाशंकर सिंह यांनी ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला नवा उत्तर भारतीय समर्थक मिळाला आहे. (senior congress leader in presence of and )

भाजपने केले होते कृपाशंकर सिंहांवर आरोप

कृपाशंकर सिंह यांच्यावर झालेल्या बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसे सापडल्याप्रकरणी अडचणीत सापडले होते. त्यानंतर ते काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने कृपाशंकर सिंह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नव्हती.

क्लिक करा आणि वाचा-
पुढे सन २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३४ ए हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित करत आपला रोख दाखवून दिला होता. काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी आपला राजीनामाच थेट सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला होता.

क्लिक करा आणि वाचा-
यानंतर कृपाशंकर सिंह यांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक निर्माण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले होते.

काँग्रेसला महापालिका निवडणुकीत फटका बसणार?

मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. मुंबईत ५० लाखांच्या आसपास उत्तर भारतीय मतदार असून उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी २५ टक्क्यांच्या जवळपास आहे. मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीयांची मते निर्णायक स्वरुपाची आहेत. उत्तर भारतीय नागरिकांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता मोठी आहे. सर्वसामान्यांचा नेता अशीही त्यांची ओळख आहे. म्हणूनच आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-

कृपाशंकर सिंह यांची राजकीय कारकिर्द

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील अत्यंत लोकप्रिय ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. काँग्रेसची सत्ता असताना सन २००४ साली कृपाशंकर सिंग यांनी गृह राज्यमंत्री भूषविले होते. सन २००९ साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला मिळालेल्या यशाचे मोठे श्रेय कृपाशंकर सिंग यांना दिले जाते. अनेक वर्षे ते आमदारही होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here