मुंबई: केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार होत असून त्यानिमित्तानं दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पकंजा मुंडे ( Tweet) यांनी एक ट्वीट करत महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या या ट्वीटमुळं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘खासदार या दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई आणि आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईतील निवासस्थानी आहोत.’

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री , खासदार , हीना गावित, भारती पवार व डॉ. यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. प्रीतम मुंडे यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. त्या दिल्लीत गेल्या असल्याचंही काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. मात्र, त्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून मागं पडल्याचं दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्या ट्वीटमुळं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रीतम मुंडे या मुंबईतच असल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप ओबीसींना व गोपीनाथ मुंडे साहेबांना विसरल्याचं काहींनी म्हटलं आहे. तर, काहींनी भागवत कराड यांना संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

वाचा:

राज्यातील भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आल्यापासून बहुजन नेत्यांचं पक्षातील महत्त्व ठरवून कमी करण्यात आल्याचा आरोप केला जातो. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं हा आरोप करताना पुढं केली जातात. यापैकी खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तावडे व मुंडे यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. असं असलं तरी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी एक शक्यता होती. ती फोल ठरली आहे. त्याऐवजी मुंडे समर्थक असलेल्या कराड यांना संधी देण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here