मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचे जावई आणि राष्ट्रवादीचे नेते गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. या वरून नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता कोणाला सीडी लावायची असेल ती त्याने लावावी, अशा शब्दात भाजप नेते यांनी खडसेंना टोला लगावला आहे. (bjp leader criticizes ncp leader )

अतुल भातखळकर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावीन, असे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करत असताना म्हटले होते. त्या वक्तव्यावरून भातखळकर यांनी आता कोणाला सीडी लावायची असेल ती त्याने लावाली असे म्हणत खडसे यांना चिमटा काढला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरू केल्याचे सांगत म्हणूनच आता ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. मुळात कर नाही त्याला डर कशाला, कोणाला जी काही सीडी लावायची असेल ती त्याने लावावी, असा टोला भातखळकर यांनी खडसे यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

एकनाथ खडसेंनाही होणार अटक?

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गिरीश चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे. चौधरी यांना पाच दिवसांची ईडीची कोठडी ठोठावण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी गिरीश चौधरी यांची ईडीने १३ तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री त्यांना अटक केली. आता माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here