पुणे : युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून पोर्तुगाल बाहेर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोनाल्डोचा हा एकदम हॉट फोटो असल्याचे काही जणांना वाटत आहे आणितो फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर पाकिस्तानच्या एका महिलेने कमेंट केली असून त्यानंतर नेमकं घडलंय तरी काय, पाहा…

आपल्या कुटुंबीयांसमवेत सुट्टीवर गेला आहे. पत्नी आणि मुलांसोबत तो सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. शॉर्टवरील एक फोटो त्याने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून त्याच्यावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका पाकिस्तानी महिलेने रोनाल्डोच्या फोटोवर दुपट्टा घे बगैरत अशी टिप्पणी केली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिची मजा घेण्यास सुरवात केली आहे.

पीळदार शरीरयष्टी असलेल्या रोनाल्डोने आपल्या हातात एक कप पकडला आहे, आणि तो एका आरामखुर्चीवर अर्धनग्न अवस्थेत निवांत बसला असल्याचे या फोटोत दिसून येते. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी, महिला त्याच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तो सध्याचा जगातील आघाडीचा फुटबॉलपटू आहे. 36 वर्षीय रोनाल्डोचा फिटनेस अनेक तरुणांना लाजवेल असा आहे. या वयातही त्याचे सिक्स पॅक अॅब्ज दिसत आहेत. रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्स आणि चार मुलांसमवेतचे फोटो सोशल मीडियात अपलोड केले आहेत.

काही वेळातच त्याच्या फोटोला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी फक्त दुपट्ट्याने काम होणार नाही असं म्हटलं आहे, तर काहींनी 6 पॅक बिस्कीट चहामध्ये बुडवण्यास सांगितले आहे. खूप प्रतिक्रिया येऊ लागल्याने वैतागून त्या महिलेने मी विनोद केला होता, पण काही लोकांना राग आल्याचे तिने म्हटले आहे.

दरम्यान या लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यात 5 गोल केले होते, पण बेल्जियमने पराभवाचा धक्का दिल्याने पोर्तुगालला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. जगभरातील प्रमुख खेळाडूंमध्ये रोनाल्डोचा समावेश होतो. ज्युवेंट्स फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू असलेल्या रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर 30 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. हा मॅजिक आकडा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here