वाचा:
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून आणि वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, गेल्या वर्षीपासून करोना प्रादुर्भावामुळे वारीच्या आयोजनाला राज्य सरकार परवानगी देत नाही. वारीत होणारी गर्दी आणि त्यातून उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकादशीच्या उत्सवात यंदा केवळ १० पालख्यांचा समावेश असेल आणि प्रत्येक पालखीत केवळ ६० वारकरी असतील. हे वारकरी केवळ एसटी बसनेच प्रवास करतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
वाचा:
सध्या राज्यात असामान्य परिस्थिती आहे. अशात आपत्ती व्यवस्थापन आणि संभाव्य धोका टाळण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. सुरक्षित वावराचा मुद्दा लक्षात घेता राज्य सरकारने ठराविक पालख्यांना परवानगी दिली असेल तर तो राज्य सरकारचा विशेषाधिकार आहे. न्यायालय त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. राज्य सरकारकडून मुख्य सरकारी वकील केतकी जोशी आणि याचिकाकर्त्याकडून अॅड. .संजय करमाकर यांनी बाजू मांडली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times