मुंबईः पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ()यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळं आज होणारी त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. तसंच, ते आज चौकशीसाठी हजर राहणार का?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर एकनाथ खडसेंनादेखील समन्स बजावण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी खडसे यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावला. गुरुवारी सकाळी ११ वाजता दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे ‘ईडी’ने म्हटले आहे. ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार, कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे.

ईडीने आज आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यानं खडसे चौकशीसाठी हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे. ज्या प्रकारे अनिल देशमुख यांनी ईडीकडून काही कागदपत्र मागवून ईडीकडून वेळ मागून घेतली होती, त्याच धर्तीवर एकनाथ खडसे हे देखील ईडीकडे वेळ मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. प्रत्यक्षात त्या भूखंडाची किंमत ३१ कोटी रुपये होती. एकंदर गैरव्यवहार बघता या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

‘ईडी’तील सूत्रांनुसार, ‘या व्यवहारात खडसे यांच्या वतीने गिरीश चौधरी यांनी बेंचमार्क बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीमार्फत हा भूखंड खरेदी केला. त्यासाठी बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीला प्रोफिशियन्स मर्केंडाइज, अब्जायोनी ट्रेडिंग, अदामिना ट्रेडिंग, केमेक्सगूड्स प्रा. लि. व पर्ल डीलर्स प्रा. लि., या पाच कंपन्यांपकडून पैसे मिळाले. या पाच कंपन्यांनादेखील याआधी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, त्या कंपन्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मुळात त्या सर्व बनावट कंपन्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता पुढील कारवाई ईडीने सुरू केली आहे. त्याअंतर्गतच गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here