सिंधुदुर्ग: कुटुंबीयांच्या व शिवसेनेच्या विरोधात बोलून जे काही मिळवायचं होतं, ते नारायण राणेंनी () मिळवलं आहे. पण आता आपण कार्यक्षम आहेत हे सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राजकारणात कुणाला एखादं पद मिळालं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. राजकारणात स्पर्धा ही काम करून दाखवण्यात असते. बोलण्यात नसते,’ अशी सूचक आणि सावध प्रतिक्रिया माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार () यांनी दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळं राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल? राणे शिवसेनेला कितपत धक्का देऊ शकतात? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत केसरकर यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत मांडलं. ‘राणेंना मंत्रिपद मिळाल्यानं शिवसेनेला फार मोठा फरक पडत नाही. उलट स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याचं दडपण राणेंवर असेल,’ असं ते म्हणाले.

वाचा:

‘राणेंना पद मिळालं म्हणून वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट स्पर्धा झाली पाहिजे, ही स्पर्धा विकासाची असली पाहिजे. ते त्यांनी करून दाखवलं तर ती स्पर्धा करताना आनंद होईल. राणेंच्या राजकारणाची सुरुवात ठाकरे कुटुंबीयांमुळे झालीय. आता त्यांना जी संधी मिळाली, त्यात त्यांनी भारतामध्ये सर्वत्र काम करावं. केंद्रातील मंत्र्याची कामगिरी चांगली झाली नाही तर मोदींच्या मंत्रिमंडळात काय होतं हे अनेक नेत्यांनी पाहिलं आहे, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

वाचा:

‘राणेंनी ठाकरे कुटुंबीयावर केलेली टीका ही पद मिळवण्यासाठी केलेली धडपड होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे सगळं महाराष्ट्राला रुचत नाही. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आणि शिवसेनेबद्दल जे काही राणे बोलतात, त्याचा उलट परिणाम होऊन मुंबई महापालिकेत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. राणे हे कोकणातले असल्यानं त्यांनी चांगलं काम करावं, अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here